कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याविषयीचे शास्त्रोक्त ज्ञान तसेच त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. साधारणपणे कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी व मांसासाठी (ब्रॉयलर) करता येते. अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचे असल्यास विविध जातींच्या कोंबड्या पाळता येतात. जसे गावठी कोंबड्या, व्हाइट लेगहॉर्न, ऱ्होड आयलॅंड रेड इत्यादी. अंड्यावरील कोंबड्यांचे वयोगटानुसार व्यवस्थापन करताना एक-सहा आठवड्यांपर्यंत लहान पिलांची निगा राखणे, 6-20 आठवड्यांपर्यंत शरीर वाढीसाठी आणि 21 आठवड्यांपासून पुढे पक्ष्यांचा अंडी उत्पादनाचा काळ असतो.
अशा पद्धतीने अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. कोंबड्यांना खाद्य व्यवस्थापन करताना वयोगटानुसार कोंबड्यांना चीक मॅश, ग्रोअर मॅश व लेअर मॅश द्यावे. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रत्येक पक्ष्याला वयानुसार साधारणपणे 1.5 ते 2.0 चौ. फूट जागा असावी. शहरी व ग्रामीण भागात कोंबडीच्या मांसासाठी (ब्रॉयलर कोंबड्यांसाठी) मागणी वाढत आहे.
मांसासाठी कुक्कुटपालन करणे सोपे व फायदेशीर ठरते. साधारणपणे पिल्ले जन्मल्यानंतर आठ आठवड्यांत विक्री योग्य होतात. पक्ष्यांची वाढ भराभर होत असल्याने असे पक्षी मांसासाठी वाढविणे किफायतशीर ठरते. कोंबडीच्या मांसासाठी विविध प्रकारच्या जातींचे पालन करता येते; परंतु भराभर वाढणाऱ्या व जास्त वजन देणाऱ्या जाती निवडाव्यात. मांसासाठी कोंबडीपालन करण्यासाठी व व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शास्त्रोक्त व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी लसीकण व बजारपे महत्त्वाची आहे. साधारणपणे एका कोंबडीस एक चौ. फूट जागा पुरेशी होते.
कोंबडी फार्मची आखणी पूर्व-पश्चिम असावी. हवेशीर व आवाजापासून दूर असावी. कोंबड्यांना बसण्यासाठी खाली लाकडी भुसा किंवा शेंगांची टरफले यांचा पाच-दहा सें.मी.चा थर द्यावा. जेणेकरून ज मिनीचा उबदारपणा टिकेल व कोंबड्यांची विष्ठा त्यात कालवली जाईल. कोंबडी घरात ऊब टिकण्यासाठी लाइटची व्यवस्था करावी. साधारणपणे दोन-तीन वॉट उष्मा प्रत्येक पक्ष्याला मिळावी या दृष्टीने व्यवस्था करावी. कुक्कुटपालनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
- 022-24131180, 24137030, विस्तार क्र.136
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई
-i want to start a new poltry forme. pls give me informetion..government sceme and zero budget..pls..i dont have any job..i am jobless..
ReplyDeletePlease give information about contract poultry farming
ReplyDeletePlease give information about contract poultry farming
ReplyDelete