Thursday, September 15, 2011

                 काश्‍मीर खोऱ्यात केशराची शेती मोठ्या प्रमाणात होते, त्याची निर्यातही होत असते; मात्र त्याच्या उत्पादनाबरोबरच काढणीपश्‍चात तंत्रज्ञानात सुधारणा करण्याच्या हेतूने जम्मू-काश्‍मीर शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय फळबाग बोर्ड (एनएचबी)च्या अंतर्गत विशिष्ट कार्यक्रम आखण्यात आला असून, त्यात केशराची काढणी, प्रक्रिया आणि नमुने तपासणीसाठीची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

              या आधी मागील वर्षी भारत सरकार, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारच्या कृषी आणि सहकार विभागाने केशर उत्पादनासाठी कार्यक्रम राबवला होता. मात्र, त्याचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने उत्पादन, उत्पादकता, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, विपणन आणि दर्जात सातत्य ठेवण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. या शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार हा नवीन प्रकल्प आखताना करण्यात आला  असून, केशर उत्पादकांसाठी सर्वसमावेशक प्रकल्प आखण्यात आला आहे.
              राष्ट्रीय फळबाग बोर्डाचे कार्यकारी संचालक बिजयकुमार यांनी याबाबत सांगितले, की या नव्या केशर प्रक्षेत्रामध्ये केशराची दर्जानुसार निवड, वर्गीकरण आणि दर्जा नियंत्रणाबरोबरच इलेक्‍ट्रॉनिक लिलाव (ई ऑक्‍शन)च्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. काश्‍मीर खोऱ्यात अयोग्य काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामुळे दर्जा नियंत्रण करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच प्रमाणकांनुसार दर्जात सातत्य ठेवण्यासाठी नियमित नमुन्याच्या चाचण्या घेणे आवश्‍यक असते, त्यासाठी आजवर राज्यात एकही प्रयोगशाळा नव्हती. या प्रकल्पात एकाच छत्राखाली प्रक्रिया केंद्र, पॅकिंग केंद्र, दर्जा नियंत्रण आणि नमुने तपासणी करणारी प्रयोगशाळा असणार आहे. त्यामुळे या पार्कचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होणार आहे.

        "एनएचबी' सहायक संचालक सी. पी. गांधी यांनी सांगितले, की हा प्रकल्प जून 2012 पर्यंत पूर्ण होणार असून, यासाठी सुमारे 24 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत.

केशर शेतकऱ्यांना प्रकल्पात मिळणाऱ्या सोयी
- केशर फुले काढणीनंतर शेतकऱ्यांना दर्जा नियंत्रणासाठी वेगळी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी टेबले आणि साठवणुकीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
- या ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित ड्रायर, हॉट ड्रायर याबरोबरच इलेक्‍ट्रॉनिक वजनकाटा, ग्रायडिंग मशिन, पॅकिंग मशिन या सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
- प्रक्रियेतील केशराचा दर्जा तपासणीसाठी नमुने गोळा करण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे.
- केशराच्या साठवणीसाठी शीतगृहाची योजना केली आहे.
- केशराच्या खरेदी - विक्रीसाठी इलेक्‍ट्रॉनिक लिलावाची आखणी करण्यात आली आहे, त्यामुळे काश्‍मिरी केशराची खरेदी - विक्री वेबसाइटच्या माध्यमातून करणे शक्‍य होणार आहे.

No comments:

Post a Comment